मुरुड हे तालुका गाव आणि महाराष्ट्र राज्य रायगड जिल्ह्यातील नगरपालिका परिषद आहे. अलिबाग पासून ४२ किमी (२६ मील) अंतरावर स्थित असलेले मुरुड हे एक पर्यटन स्थळ आहे. प्रसिद्ध असा 'नवाब महाल' मुरुडमध्ये आहे. १८८५ मध्ये प्रशासकीय हेतूने हा महाल बनवला गेला.