गारंबीचे धरण (Garambi-Dam)
जंजिरा संस्थानाचा पुरोगामी विकास करणार सर सिद्यी अहमदखान यांनी व्हक्टोरिया राणीच्या भारत भेटीची आठवण म्हणून गांरबीच्या जंगलातील धरणास व्हक्टोरिया वॉटर वक्र्स हे नाव दिले. नैसर्गक पाणी अडवून बांधलेले हे धरण मुरूडच्या पूर्वेला जवळपास आठ किमी. अंतरावर असून हे गारंबी धरण म्हणून प्रसिध्द आहे. मुरूड शहरास पिण्याचे पाणी याच ठिकाणावरून पूर्णपणे नैसर्गक प्रवाहाच्या वेगाचा वापर करून पुरविले जाते. पावसाळयात पर्यटक पाण्याच्या प्रवाहात डुंबण्यासाठी हमखास याठीकाणी येतात. वनभोजनासाठी हे आदर्श ठिकाण आहे. पाण्याच मूळ प्रवाह दूषित न करण्याचे सामंजस्य बाळगून निसर्गाचा आनंद घेण्यास कोणतीच हरकत नाही. दरीत उतरणारी जांभ्या दगडातील पायवाट चहूबाजूस प्रचंड वृक्षराजी मोठे-मोठे खडक वाहत्या पाण्याची गाज पक्षांची किलबील यामुळे पर्यटक गारंबी परिसरात खिळून जातात







Add new comment