सवतकडा धबधबा (sawatkada waterfall)
मुरूंड शहराजवळ गारंबी धरणाकडे जावे. या गावातून सायगावमार्गे सवतकडा धबधब्यावर जाता येते. धबधब्यापर्यंत गाडी जाऊ शकत नाही. पायवाटेने डोंगर व शेतातून वनश्रीचा आनंद घेत चालत अर्ध्या तासात धबधब्यापर्यंत पोहचता येते.
पावसाळयात हा जलप्रपात इतका प्रचंड असतो कि थेट पाण्याखाली जाणे अशक्यच. टेंकग वगैरे करणार्या साहसी पर्यटकांसाठी मात्र आदर्श ठिकाण आहे.
सामान्य निसर्गप्रेमी पर्यटक मात्र नंतर हिवाळयापर्यंत धबधब्याचा आंनद घेऊ शकतो. जानेवारीनंतर पाण्याचा झोत कमी होत जाऊन धारा बारीक होतात.
धबधब्यावर महालोर गाव आहे. फार पूर्वी गुरे चरायला घेऊन जाणार्या दोन सवती याठिकाणी एकमेकींचा काटा काढतांना सोबत पडून मृत्यू पावल्या. त्यामुळे यास सवतकडा नाव पडले अशी दंतकथा आहे. इथला निसर्गमात्र वेगळया विश्वात निश्चंत खिळवून ठेवतो.







Add new comment