अलिबाग (Alibaug)
बेन अलि नामक व्यक्तीने या परिसरात विहिरी खोदून आंबा आणि नारळाच्या बागा लावल्या म्हणून या शहराला 'अलिबाग' नावाने ओळखले जाते. समुद्रकिनारी वसलेले हे छोटे शहर रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. समुद्रकिनार्यापासून जवळच कुलाबा हा जलदुर्ग आहे. या किल्ल्यामुळे जिल्ह्याला पूर्वी कुलाबा असे नाव देण्यात आले होते. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मायनाक भंडारी या आरमारप्रमुखाचे वास्तव्य होते. हा किल्ला प्रबळ असल्याने १६८० नंतर मराठी आरमाराचे कान्होजी आंग्रे यांनीही आपली सत्ता येथूनच राबवली. अलिबागजवळच खांदेरी व उंदेरी असे दोन भव्य जलदुर्गही आहेत. खांदेरी किल्ल्यावर बोटींना मार्गदर्शन करणारे दीपगृह आहे.
