भू-चुंबकीय वेधशाळा (Observatory Vedhshala)
एप्रिल १९०४ साली ’’ अलिबाग भूचुंबकीय वेधशाळेची ’’ स्थापना करण्यात आली. ही वेधशाळा दोन इमारतीत विभागली असुन एका इमारतीत मॅग्नेटोमीटर बसविलेले आहेत. त्याच्या सहाय्यने भूचुंबकीय क्षेत्रामध्ये दररोज होणार्य बदलांची नोंद केली जाते. मॅग्नेटोमीटरच्या सभोवताली एक मीटर रुंदीच्या तीन भिंती आहेत. त्यामुळे मॅग्नेटोमीटर ठेवलेल्या खोलीतील तापमानात जास्त बदल होत नाहीत. दुसर्या इमारतीत भूचुंबकीय क्षेत्राच्या विविध घटकांचे निरपेक्ष मापन केले जाते. या इमारतीच्या बांधकामामध्ये चुंबकीय गुणधर्म नसलेले पोरबंदर वाळुचे दगड, पितळ व तांब्याच्या वस्तु वापरल्या आहेत. वेधशाळेमध्ये होत असलेल्या भूचुंबकीय क्षेत्राच्या नोंदींचा उपयोग भूचुंबकीय वादळाची तसेच इतर अनेक चुबकीय कार्यप्रकि्रयांची माहिती मिळण्यास होतो. त्या मुळेच जगभरातील शास्त्रज्ञांकडुन या भूचुंबकीय माहितीला सतत खूप मागणी असते. या वेधशाळेचे जगतास होत असलेले योगदान लक्षात घेवून भारत सरकारने १९७१ साली या वेधशाळेची पुर्नस्थापना ’’ भारतीय भूचुंबकत्व संस्था ’’ विज्ञान आणि तंत्रज्ञान या विभागा अंतर्गत कार्यरत केली. अधुनिक काळाची गरज लक्षात घेवून अलिबाग येथील भूचुंबकीय बदल नोंदणार्या साधनांचे नुतनीकरण केले गेले. ’’ इंटरमॅग्नेट ’’ या अंतरराष्ट्रीय प्रकल्पाची गरज तसेच सहभागाच्या दृष्टीकोनातुन १९९७ पासुन अलिबाग वेधशाळेने १ मिनीट इतक्या सुक्ष्म कालावधीत घडून येणार्या भूचुंबकीय बदलांची नोंद करुन ती मिनीटा गणिक अंतरराष्ट्रीय केंद्राकडे पाठविण्यास एप्रिल २००१ पासुन सुरुवात केली. या वेधशाळेत जवळजवळ १५० वार्षापेक्षा जास्त कालावधीच्या भूचुंबकीय मापनांची नोंद आहे.







Add new comment