सुधागड/भोरपगड किल्ला (Sudhagad/Bhorapgad)

सुधागड (भोरपगड) किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगामध्ये असलेला प्रेक्षणीय किल्ला आहे. हा किल्ला पुण्यापासून पश्चिमेकडे सुमारे ५० किमी, लोणावळ्यापासून दक्षिणेकडे सुमारे २५ किमी तसेच रायगड जिल्ह्यातील पाली या ठिकाणापासून पूर्वेकडे १० किमी अंतरावर आहे. सुधागड किल्ल्याला भोरपगड असेही नाव आहे. शिवाजी महाराजांनी भोरप गडाचे नाव बदलून सुधागड किल्ला असे केले. सुधागड परिसरात ठाणाळे आणि खन्डसाबळे लेण्यांचे अस्तित्त्व आहे. सुधागड पठाराचे तीन विभाग होतात. पहिला विभाग म्हणजे वाड्यासमोरील पश्चिमेकडील पठार. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वास्तूंचे अवशेस दिसतात कारण जमीन समतोल असून येथेच तलाव आणि मोठी टाकी आहे. दुसरा विभाग म्हणजे भोराई देवीचे मंदिर आणि टकमक टोकापर्यंत असलेला परिसर. येथे चार विशाल कोठारांचे अवशेष आहेत. तर तिसरा भाग म्हणजे पूर्वेकडील परिसर. इकडे एक विशाल बुरुज असून वाढलेल्या जंगलात काही अवशेष आढळून येतात.

Add new comment