श्रीवर्धन (Shrivardhan)
पेशव्यांचे मूळ गाव असलेल्या श्रीवर्धनचे ३ किमी. लांबीचा अथांग, शांत, मनाला निवांत करणारा सागरतीर हे मुख्य आकर्षण. येथील पेशवे मंदिरातील चौथर्यावर पेशवे स्मारक बांधण्यात आले आहे. या ठिकाणी सोमजाई मंदिर, जीवनेश्वर मंदिर, राम मंदिर, कुसुमादेवी मंदिर अशी अनेक मंदिरे पाहायला मिळतात. श्रीवर्धन हे ऐतिहासिक काळापासूनच एक व्यापाराचे ठिकाण होते. तसेच ते कोकणातील महत्वाचे बंदर होते. सोळाव्या-सतराव्या शतकात श्रीवर्धन हे प्रथम अहमदनगरच्या निजामाच्या ताब्यात होते. नंतर हे विजापूरच्या आदिलशहाकडे होते. त्यानंतर हे नगर जंजिराच्या सिद्दीकडे होते. बाळाजी विश्वनाथ भट यांचे हे जन्मगाव आहे. ते श्रीवर्धनचे देशमुख होते. त्याचप्रमाणे ते मराठी साम्राज्याचे छत्रपती साताऱ्याचे शाहू महाराज यांचे पहिले पेशवा होते
