माथेरान

माथेरान

माथेरान हे एक वृक्षाच्छादित असलेले ८०० मीटर उंचीवर असलेलले एक थंड हवेचे ठिकाण आहे. प्रवासाकरीता एक टॉय ट्रेन सुद्धा उपलब्ध आहे. माथेरानला जाताना 'टॉय ट्रेनने' होणारा दोन तासाचा प्रवास स्मरणीय असतो. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या या स्थानाला भेट देताना विविध पक्षी, माकडे आणि हिरव्यागार डोंगरांची समृद्धी सभोवती असल्याने हा प्रवास संपूच नये असे वाटते. सोबत पॅनोरमा, गॅरवॅट अलेक्झांडर, वनट्री हील असे विविध पॉईंट पर्यटकांना आकर्षित करतात.

माथेरानच्या उंच खड्ड्यांसह, खालील पठार आकर्षक दृश्य अनुभवू शकता. रात्रीच्या वेळी मुंबई ठिकाणचे दिव्यांची रोशनाई दिसते. माथेरानमध्ये पुढील पिकनिक स्थळे तुम्ही पाहू शकता – पॅनोरामा पॉईंट, किंग जॉर्ज पॉईंट, इको पॉईंट, लॉर्ड पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, पेमास्टर्स पार्क, पोर्कूपाइन पॉईंट (सनसेट पॉईंट), रामबाग पॉईंट, अॅलेक्झांडर पॉईंट, लुईओसा पॉइंट इत्यादी.सर्व पिकनिक स्थळे पाहण्यासाठी घोड्यांची सवारी उपलब्ध आहे.येथेशिवाजी महाराज्यांच्या जीवानावर स्थित असे वस्तू-संग्रालय आहे.

मुंबई किंवा पुण्याहून माथेरानला जाताना कर्जतपर्यंत रेल्वे अथवा लोकलने जावून तेथून नेरळला लोकलने जावे लागते. नेरळपर्यंत एसटी बसेसचीदेखील सोय आहे. नेरळहून 'टॉय ट्रेन' अथवा खाजगी टॅक्सीने जाता येते. खाजगी वाहन मात्र केवळ 'दस्तुरी पॉईंट' पर्यंत नेता येते. त्यानंतर घोड्यावर बसून अथवा पायी भटकंती करावी लागते. हा अनुभवदेखील स्मरणीय असाच असतो.

Add new comment