वरंध गावातील गावकरी वनराईच्या सहाय्याने १९९५ सालापासून दरवर्षी गावातील २ ओढ्यांवर एकंदर १२ वनराई बंधारे बांधतात. पहिल्या वर्षाच्या बंधाऱ्यातील पाणी देऊन ३० ते ४० एकर जमिनीतील भात शेती वाचवण्यात आली. बंधार्यांमुळे विहिरीतील पाण्याची पातळी वाढली. त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांविषयी खात्री पटली आणि रोजगार हमी योजने अंतर्गत १९९६ साली रायगड जिल्ह्यात एकंदर ९६८ वनराई बंधारे बांधून घेतले.