एलिफंटा केव्हज - घारापूर लेणी (Elephanta Gharapuri Caves)
मुंबईहून सात किलोमीटर अंतरावर असलेले उरण तालुक्यातील घारापूरी बेट 'एलेफंटा केव्हज्' म्हणून प्रसिद्ध आहे. दगडात कोरलेल्या या गुंफा सातव्या शतकातील आहेत. या गुंफांना जागतिक हेरिटेजचा दर्जा मिळाला आहे. गुहेत निर्माता, रक्षक आणि संहारकाचे प्रतिक असलेले शिवशंकराचे त्रिमूर्ती शिल्प आहे. इतरही शिल्पे प्रेक्षणीय आहेत. येथे जाण्यासाठी मुंबई येथील अपोलो बंदर आणि गेट वे ऑफ इंडिया येथून बोटींची सुविधा आहे. घारापुरी (एलिफंटा) गुंफा या समुद्रामध्ये असलेल्या एका सदा हरित बेटावर साधारणपणे ७ व्या शतकापासुन अस्तित्वात असलेले एक आश्चर्यच म्हणावे लागेल. अत्यंत काळजीपर्वक कातळा मध्ये कापुन बांधलेल्या या गुंफा श्री शंकराला समर्पित आहेत. येथील जगप्रसिध्द 'महेश मुर्ति' ही शिवाच्या 'निर्माता, रक्षणकार्ता व संहारक' या तीन विविध अंगाची महाती सांगणारी आहे. मुंबई येथील 'गेट वे ऑफ इंडिया' येथुन रोज घारापुरी (एलिफंटा) गुंफा येथे जाण्यासाठी होडीची सेवा असते। घारापुरी (एलिफंटा) गुंफा या दर्शनास दर सोमवारी बंद असतात.







Add new comment