जिजामाता कृषिभुषण पुरस्कार
राज्यातील शेती क्षेत्राची सातत्याने होत असलेली प्रगती व या प्रगतीत उत्पादन वाढीत महिलांचाही फार मोठा वाटा आहे व तो सातत्याने वाढत असुन, शेती, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक चळवळीत महिला सातत्याने पुढे येत आहेत. शेती विकासाच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची बाब, तसेच शेती क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा यथेाचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने सन १९९५ पासुन राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत कृषिभुषण पुरस्कारांच्या धर्तीवर फक्त महिलांसाठीच जिजामाता कृषिभुषण पुरस्काराची सुरुवात केली आहे.
राज्यातुन दरवर्षी पाच (५) महिला शेतक-यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. पुरस्कारार्थी महिलांना प्रत्येकी रुपये ५०,०००/- (रुपये पन्नास हजार) रोख आणि स्मृतीचिन्ह, तसेच पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार निवडीसाठी मा. मंत्री (कृषि) यांच्या अध्यक्षेखाली अस्तित्वात असलेल्या मंत्री समितीमार्फत राज्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करण्यात येऊन, सदर समितीने निवड केलेल्या महिला शेतक-यांस हा पुरस्कार देण्यात येतो.
सन २०१३ अखेर ९० महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.







Add new comment