काजूसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना
ही योजना काजू पिकासाठी अधिसूचित जिल्ह्यामधील तालुक्यातील निवडलेल्या महसूल मंडळात लागू करण्यात येईल. यानुसार निवडलेल्या विमा कंपनीमार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर त्रयस्थ संस्थेमार्फत संदर्भ हवामान केंद्र स्थापित करण्यात येईल. या योजनेअंतर्गत काजू पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालीलप्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.
टीप : विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता त्या-त्या जिल्ह्याला वेगवेगळा लागू राहील.
सदर फळपीक विमा योजना खालील यंत्रणेमार्फत खालील जिल्ह्यांतील काजू फळपिकासाठी अधिसूचित केलेल्या महसूल मंडळ पातळीवर कार्यान्वित करण्यात येईल. या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, संबंधित विमा कंपनीकडे संपर्क साधून अधिक सविस्तर माहिती घ्यावी आणि योजनेत सहभाग घ्यावा.







Add new comment