वाघबीळ नाचणटेपाची गुहा (guns of pachad)
पाचाडखिडींत रायगडाकडे तोडं ऊभे करुन ऊभे राहिले की मागे फक्त 05 मिनीटांच्या सोप्प्या चढाईवर हि एक मानवनिर्मित "अश्मयुगीन गुहा " आहे.
तीन तोंडे असणारी ही गुहा अश्मयुगातील एक अलंकार आहे. पुढिल अर्धगोलाकार मुखातुन बा रायगड अतिशय सुरेख दिसतो. संपुर्ण जगात अशा तीन तोंडे असणा-या फक्त दोनच गुहा आहेत.
1. गन्स ऑफ नेव्हरॉन ( युरोप )
2. वाघबीळ/नाचणटेपाची गुहा .
वाघबीळ : वाघाच्या डोळ्यासमान पाचाड गावाकडिल ह्याचे दोन भोके दिसतात .
नाचणटेपाची गुहा : शिवकालिन स्थानिक रहिवासी ह्या "टेपाडावर" कोकणी नाचणी धान्याचा साठा ठेवत असा एक समज .
गन्स ऑफ पाचाड : ईंग्रजांवर अधिक प्रेम करणा-या काही ट्रेक मंडळीनी युरोपियन धरतीवर दिलेले नाव .
ह्या गुहेतुन रायगडाचे रौद्रमयी दर्शन तर होतेच अन जोडीला कोकणदिवा, कावल्या-बावल्या, धानुचा डिग्गा न्याहळता येतो. एकाच वेळी राजधानी रायगड अन जिजाऊमासाहेंबांचे पाचाडकोट ह्यावर नजर ठेवता येत असल्याने शिवकालात येथे काही सैनिक तैनातीस असावे असा फक्त अंदाज व्यकत करता येतो.







Add new comment