माझा प्रवास- विष्णुपंत गोडसे (Maza Prawas - Vishnupant Godse)
माझा प्रवास हे विष्णुपंत गोडसे भटजी ह्यांनी लिहिलेले पुस्तक आहे. १८५७च्या धामधुमीच्या काळातील केलेल्या प्रवासाचा अनुभव ह्या पुस्तकात ग्रथित झाला आहे. हे पुस्तक चिंतामण विनायक वैद्य ह्यांनी गोडसे भटजींच्या मृत्यूनंतर, म्हणजे १९०७ साली माझा प्रवास : सन १८५७च्या बंडाची हकीकत ह्या नावाने प्रकाशित केले. गोडसे भटजी ह्यांनी उत्तर कोकणातील वरसई ह्या गावापासून ग्वाल्हेरला आपल्या काकांसोबत केलेल्या प्रवासाची हकीकत ह्या पुस्तकात आली आहे. हे प्रवासवर्णन मराठीतील पहिले प्रवासवर्णन मानले जाते. 'माझा प्रवास'मधील काही भाग : या झांशी शहरात पूर्वी घडलेली एक विलक्षण गोष्ट ऐकिवात आली ती सांगण्यासारखी आहे. थोरले माधवराव पेशवे यांचेवेळी झांशीत पारोळकर यांचे पदरी नारायणशास्त्री म्हणून विद्वान ब्राह्मण होते.







Add new comment