बल्लाळेश्वर मंदिर
अष्टविनायकां पैकी प्रसिध्द श्री बल्लाळेश्वराचे मंदिर रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात पाली येथे आहे. बल्लाळेश्वराची मुर्ती पुर्वाभिमुख आहे, उपरणे व अंगरखा असा ब्राम्हण वेश ल्यायलेला हा अष्टविनायकातील एकमेव गणपती आहे. हे मंदिर पाली गावात असून रायगड जिल्ह्यातील कर्जतपासून सुमारे ६० किमी अंतरावर आहे. हे ठिकाण सागरगड किल्ला आणि अंबा नदी पासून जवळच आहे.
असे म्हणतात की मोरेश्वर विठ्ठल सिंदकर (दिघे) यांनी इसवी सन १६४० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिरात एक पुरातन घंटा असून तिला चिमाजी आप्पांनी वसई आणि सस्तीमधील लढाईत पोर्तुगीजांना पराभूत करून आणले होते. १७६० साली मूळ लाकडी मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले व श्री फडणीस यांनी दगडी मंदिर आकारास आणले.







Add new comment