श्री विक्रम विनायक मंदिर
अलिबागपासून सुमारे २० किमी. तर मुरूडपासून ३२ किमी. अंतरावर साळाव या निसर्गरम्य गावी उंच टेकडीवर श्री विक्रम विनायक मंदिर बांधले आहे. या ठिकाणी बिर्ला उद्योग समुहाच्या विक्रम इर्स्पात कंपनीचा भव्य प्रकल्प असून सदर मंदिर बिर्ला उद्योग समूहाने बांधले आहे. पांढर्याशुभ्र संगमरवरातून साकारण्यात आलेला मंदिराचा भव्य कळस अती दूरवरूनही नजरेस पडतो. टेकडीच्या पायथ्याशी प्रवेशार आहे. येथून मंदिराकडे जाणारा रस्ता पायर्यांचा आहे तसेच पायर्यांच्या जवळूनच नागमोडी वळणाचा वाहनांसाठी बनवलेला रस्ताही आहे. मंदिराच्या सभोवताली नयनरम्य बागबगिचा असून त्यातील फुलझाडे रंगीत कारंजी नेत्रसुखद आकर्षक असल्यामुळे मन प्रसन्न होते. मंदिराचा सभामंडप चारही बाजूंनी मोकळाच असून छत पारदर्शक पॉलिकॉप र्शिटचे असल्यामुळे सभामंडपात प्रकाश व मोकळया हवेचा संचार असतो. मंदिराच्या चौकोनी गाभार्यात श्री गणेशाची भव्य मूर्ती आहे. बाजूच्या लहान मंदिरातून राधा-कृष्ण शंकर-पार्वती देवी दुर्गामाता आणि सुर्यदेव यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. मंदिराच्या परिसरीतील बागेमध्ये स्व. आदित्य बिर्ला यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. बागेचा परिसर व मंदिर यांतील विद्युत रोषणाई नेत्रदिपक व आकर्षक आहे.







Add new comment