कर्नाळा (Karnala)

karnala

मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून 10 किलोमीटर अंतरावर असणारा कर्नाळा किल्ल्याचा 12 किलोमीटरचा परिसर पक्षी अभयारण्य म्हणून परिचित आहे. सव्वाशेपेक्षा जास्त प्रकारचे पक्षी आणि पंचवीसपेक्षा जास्त स्थलांतर करणारे पक्षी अभयारण्यात आढळतात. हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. पनवेल जवळ सुमारे १० किमी. अंतरावर कर्नाळा हा प्रचंड डोंगरी किल्ला वसलेला आहे. ५०० मीटरहून अधिक उंच असलेला हा किल्ला पर्यटकांचे व गिर्यारोहकांचेही मुख्य आकर्षण आहे. किल्ल्याच्या सभोवती साडेचार किमी. क्षेत्रात हे अभयारण्य पसरलेले आहे.

Add new comment